A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जो या नगरा भूषण

जो या नगरा भूषण खरा । जैसा भाळीं शोभे हिरा ।
ज्याच्या सद्गुणगानीं गिरा । रंगली सुजनांची ॥

निर्धन असतां धनदापरी । औदार्यातें अंगी धरी ।
दुर्दैवानें छळिलें तरी । शील न सोडी जो ॥

करि जो दीनावरतीं दया । लोकीं वागे पाहुनि नया ।
वाहिली ही मीं काया तया । निर्मल भावानें ॥