जो तो सांगे ज्याला त्याला
जो तो सांगे ज्याला त्याला
वेड लागले राधेला
पीताम्बराची साडी ल्याली
मोरपिसांची करी काचोळी
वेळीअवेळी काजळकाळी
उटी लाविते मुखचंद्राला
विळखा सुंदर कचश्रेणीचा
मुकुट चढविते फुलवेणीचा
हार अर्पिता मुक्तामणीचा
मोडीत डोळे प्रतिबिंबाला
डुंबत अविरत यमुना डोही
राधेची ती कृष्णा होई
मिठी मारते ओलेतीही
शेषशायी भगवंताला
वेड लागले राधेला
पीताम्बराची साडी ल्याली
मोरपिसांची करी काचोळी
वेळीअवेळी काजळकाळी
उटी लाविते मुखचंद्राला
विळखा सुंदर कचश्रेणीचा
मुकुट चढविते फुलवेणीचा
हार अर्पिता मुक्तामणीचा
मोडीत डोळे प्रतिबिंबाला
डुंबत अविरत यमुना डोही
राधेची ती कृष्णा होई
मिठी मारते ओलेतीही
शेषशायी भगवंताला
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
कच | - | केस / बृहस्पतीपुत्र. हा पुष्कळ दिवस शुक्राचार्यांजवळ राहून संजीवनी विद्या शिकला. शुक्राचार्यांच्या कन्येचे, देवयानीचे, याच्यावर प्रेम होते. |
काचोळी | - | मागे बंद असलेली चोळी. |
डोळे मोडणे | - | डोळ्यांनी खुणा करणे, नखर्यांनी पाहणे. |
मुक्ता | - | मोती. |
श्रेणी | - | वेणी. |
शेष | - | पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.