जो प्यारा त्याचे नाम
जो प्यारा त्याचे नाम म्हणा
कुणी रहीम म्हणा, कुणी राम म्हणा
गंगातीरी याची काशी
त्याचा काबा मक्केपाशी
या दोघा पावन धाम म्हणा
कुणी रहिम म्हणा, कुणी राम म्हणा
सूर्या पाहून हा जप करितो
चांद पहाया तो हुरहुरतो
ते तिसरे ते जे अनाम म्हणा
कुणी रहिम म्हणा, कुणी राम म्हणा
नानक सांगे सार्या जगता
धर्म दुजा नच सत्या परता
जो विश्वाचा विश्राम म्हणा
कुणी रहिम म्हणा, कुणी राम म्हणा
कुणी रहीम म्हणा, कुणी राम म्हणा
गंगातीरी याची काशी
त्याचा काबा मक्केपाशी
या दोघा पावन धाम म्हणा
कुणी रहिम म्हणा, कुणी राम म्हणा
सूर्या पाहून हा जप करितो
चांद पहाया तो हुरहुरतो
ते तिसरे ते जे अनाम म्हणा
कुणी रहिम म्हणा, कुणी राम म्हणा
नानक सांगे सार्या जगता
धर्म दुजा नच सत्या परता
जो विश्वाचा विश्राम म्हणा
कुणी रहिम म्हणा, कुणी राम म्हणा
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | अनूप जलोटा |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
काबा | - | मक्केच्या मशिदीतील पवित्र दगड. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.