जिवलगा प्रीती अबोल झाली
सायंकाळी निवांतवेळी रातराणी उमलली
जिवलगा, प्रीती अबोल झाली
निनादले रे माझे कंकण
अमृतवेळी फुलला क्षणक्षण
मिटल्या नयनी स्वप्ने लपवून
तुझीच राणी तुजवर रुसली
विरहामधले देणेघेणे
वसूल केले आतुरतेने
जे न साधले कधी शब्दाने
ते सगळे रे नजर बोलली
अशा प्रीतीची रंगत न्यारी
तेच आपुले सुख संसारी
स्वर्ग अवतरे आणि भूवरी
वंशदीप रे जीवन उजळी
जिवलगा, प्रीती अबोल झाली
निनादले रे माझे कंकण
अमृतवेळी फुलला क्षणक्षण
मिटल्या नयनी स्वप्ने लपवून
तुझीच राणी तुजवर रुसली
विरहामधले देणेघेणे
वसूल केले आतुरतेने
जे न साधले कधी शब्दाने
ते सगळे रे नजर बोलली
अशा प्रीतीची रंगत न्यारी
तेच आपुले सुख संसारी
स्वर्ग अवतरे आणि भूवरी
वंशदीप रे जीवन उजळी
गीत | - | योगेश्वर अभ्यंकर |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | कुमुद भागवत |
गीत प्रकार | - | भावगीत |
रंगत | - | मौज. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.