A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झिंगतो मी कळेना कशाला

झिंगतो मी कळेना कशाला
जीवनाचा रिकामाच प्याला !

काढली रात्र जागून सारी
चंद्र माझा सकाळीच आला !

दूर झाले फुले वेचणारे
वेचतो मी फुलांतील ज्वाला

'काय झाले पुढे आसवांचे?'
हे विचारू नये सांत्‍वनाला

गाव सारेच हे तोतयांचे
नाव माझे विचारू कुणाला?