A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झाले मोकळे आकाश

दळ उमलत जाते एकेक
वर दंवबिंदूंची थरथर
मन धुक्यात हरवत जाते
अंधारपरतीच्या वाटेवर
लख्ख उजळून आले श्वास
झाले मोकळे आकाश !

नाते सावरताना माझ्या अश्रूंचा प्रकाश
म्हणेल ओली माती, झाले मोकळे आकाश !
गीत - गजेंद्र अहिरे
संगीत - अभिराम मोडक
स्वर- बेला शेंडे, सावनी शेंडे
गीत प्रकार - मालिका गीत
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका- झाले मोकळे आकाश, वाहिनी- झी मराठी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.