जीवित माझे हवे तर
जीवित माझे हवे तुला तर, घेऊन जा तू आता
सुवासिनीचे कुंकू हिरावुन नकोस नेऊ नाथा
संसाराची पूजा जाशी उधळून अर्ध्यावरती
मंगल मी रे रचिले देऊळ तुझ्याच मूर्तीभवती
अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीती
ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता
तुझ्यासवे तो हर्षही गेला, खेदही उरला नाही
पतिव्रतेला दर्शनाची खंतही आता नाही
कुंकुमतिलक भूषण भाळी, इतुकेच नाथा देई
मिळेल मजला भाग्य सतीचे, तूही जवळी नसता
सुवासिनीचे कुंकू हिरावुन नकोस नेऊ नाथा
संसाराची पूजा जाशी उधळून अर्ध्यावरती
मंगल मी रे रचिले देऊळ तुझ्याच मूर्तीभवती
अश्रुफुलांचा अभिषेक करिते विरहिणीची प्रीती
ढळेल शांती पुजारिणीची कळस गोपुरी नसता
तुझ्यासवे तो हर्षही गेला, खेदही उरला नाही
पतिव्रतेला दर्शनाची खंतही आता नाही
कुंकुमतिलक भूषण भाळी, इतुकेच नाथा देई
मिळेल मजला भाग्य सतीचे, तूही जवळी नसता
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | वादळ |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
गोपुर | - | देवळाचे मुख्य दार. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.