जीवन त्यांना कळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
मीपण ज्यांचें पक्व फळापरी सहजपणाने गळलें हो
जळापरी मन निर्मळ ज्यांचें, गेलें तेथें मिळलें हो
चराचराचें होउनि जीवन स्नेहासम पाजळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
सिंधूसम हृदयांत जयांच्या रस सगळे आकळले हो
आपत्कालीं अन् दीनांवर घन होउनि जे वळले हो
जीवन त्यांना कळलें हो
दूरित जयांच्या दर्शनमात्रें मोहित होऊन जळलें हो
पुण्य जयांच्या उजवाडाने फुललें अन् परिमळलें हो
जीवन त्यांना कळलें हो
आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो
सायासाविण ब्रह्म सनातन घरींच ज्यां आढळलें हो
उरींच ज्यां आढळले हो

गीत | - | बा. भ. बोरकर |
संगीत | - | सलील कुलकर्णी |
स्वराविष्कार | - | ∙ रवींद्र साठे, अंजली मराठे, अनुराधा मराठे ∙ श्यामा चित्तार, कैलासनाथ जैस्वाल ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- १७ सप्टेंबर १९४७. • स्वर- रवींद्र साठे, अंजली मराठे, अनुराधा मराठे, संगीत- सलील कुलकर्णी. • स्वर- श्यामा चितार, कैलासनाथ जैस्वाल, संगीत- ???. |
आकळणे | - | आकलन होणे, समजणे. |
उजवाड | - | उजेड. |
तुळा(ला) | - | वजन काटा. |
दुरित | - | पाप. |
सनातन | - | शाश्वत, चिरकाल. |
सायास | - | विषेष आयास (कष्ट), श्रम. |
सिंधु | - | समुद्र. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.