जीवन आहे जगण्यासाठी
लिहिले काही असो ललाटी
जीवन आहे जगण्यासाठी
काट्यामधुनी फूलही हसते
ढगांत काळ्या वीज चमकते
मातीतून नवविश्व उमलते केवळ हसण्यासाठी
आयुष्याच्या ध्येयपथावर
लढती जे दैवाशी खडतर
देव घालितो विजयश्रीची माळ तयांच्या कंठी
शिल्पकार तू तुझ्या कृतीचा
भाग्यलेख तू लिही स्वत:चा
जगी तुला प्रतिकार कुणाचा? भाग्य तुझे तव हाती
जीवन आहे जगण्यासाठी
काट्यामधुनी फूलही हसते
ढगांत काळ्या वीज चमकते
मातीतून नवविश्व उमलते केवळ हसण्यासाठी
आयुष्याच्या ध्येयपथावर
लढती जे दैवाशी खडतर
देव घालितो विजयश्रीची माळ तयांच्या कंठी
शिल्पकार तू तुझ्या कृतीचा
भाग्यलेख तू लिही स्वत:चा
जगी तुला प्रतिकार कुणाचा? भाग्य तुझे तव हाती
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | पैशांचा पाऊस |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
ललाट | - | कपाळ. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.