जयजयकारा करा गर्जू द्या
जयजयकारा करा गर्जू द्या ज्ञानांच्या वाटा
देवाहूनही मान थोर रे देव माणसाचा
तो नीतीचा पुतळा केवळ निंदेने मळला
हरपून गेल्यावरी हिर्याचा उजेड त्या कळला
पस्तावा हो या गावाला आता अपराधाचा
चला उभारू स्मारक त्याचे मोक्याच्या जागी
असा कधी ना झाला होईल जन-नेता त्यागी
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा
गेला तो तरी स्मरणरूपाने आपणात आहे
जोवर वरदा-कृष्णा-गोदा देशातून वाहे
कीर्ती-मूर्ती अमर तयाची, अमर मार्ग त्याचा
देवाहूनही मान थोर रे देव माणसाचा
तो नीतीचा पुतळा केवळ निंदेने मळला
हरपून गेल्यावरी हिर्याचा उजेड त्या कळला
पस्तावा हो या गावाला आता अपराधाचा
चला उभारू स्मारक त्याचे मोक्याच्या जागी
असा कधी ना झाला होईल जन-नेता त्यागी
मावळल्याने होतो का रे अस्त भास्कराचा
गेला तो तरी स्मरणरूपाने आपणात आहे
जोवर वरदा-कृष्णा-गोदा देशातून वाहे
कीर्ती-मूर्ती अमर तयाची, अमर मार्ग त्याचा
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | सुधीर फडके |
चित्रपट | - | देवमाणूस |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.