A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय जवान जय किसान

एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !

अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होउनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !

शत्रू-मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधु आसमान
जय जवान, जय किसान !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत -
स्वर-
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
कसणे - नांगरणे.
भूमिदास - शेतकरी.
सस्य (शस्य) - धान्य.
सिंधु - समुद्र.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.