A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय देवी मंगळागौरी

जय देवी मंगळागौरी
सुवासीन मी तुला पूजिते

कुंकुम-तिलक माझ्या ललाटी
मंगल-मणी हे शोभत कंठी
रत्‍न-पाचूचा चुडा मनगटी
स्त्रीजन्माचे अहेव लेणे
तुझ्या कृपेने मला लाभते

शिवशंकराहुनी प्रेमळ भोळा
दिधलासी पती तू भाग्यवतीला
देहाच्या देव्हारी पूजीन त्याला
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती
अमृत तेजाळ प्रीत जळते