जरि या पुसून गेल्या
जरि या पुसून गेल्या सार्या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे
त्या बावर्या कळीने ते स्वप्न पाहिलेले
वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले
छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे
ते श्वास कापरे अन् आभास सावल्यांचे
रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे
अन् सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे
नाही विचार केला, मी पाहिले न मागे
आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे
का घालिता उडी ही घर आठवे कुणा रे?
मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा
चुरडे कळी मनाची हा खेळ प्राक्तनाचा
स्वप्ने विरून येते हातात वंचना रे
हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे
वेडी कळी तुझी ही बघते वळून मागे
या पापण्यांत मिटते निःशब्द वेदना रे?
हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे
त्या बावर्या कळीने ते स्वप्न पाहिलेले
वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले
छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे
ते श्वास कापरे अन् आभास सावल्यांचे
रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे
अन् सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे
नाही विचार केला, मी पाहिले न मागे
आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे
का घालिता उडी ही घर आठवे कुणा रे?
मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा
चुरडे कळी मनाची हा खेळ प्राक्तनाचा
स्वप्ने विरून येते हातात वंचना रे
हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे
वेडी कळी तुझी ही बघते वळून मागे
या पापण्यांत मिटते निःशब्द वेदना रे?
गीत | - | मंगेश पाडगांवकर |
संगीत | - | यशवंत देव |
स्वराविष्कार | - | ∙ शोभा जोशी ∙ उषा अत्रे-वाघ ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत, शब्दशारदेचे चांदणे, कल्पनेचा कुंचला |
वंचना | - | फसवणूक. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.