जाळीमंदी पिकली करवंदं
भर उन्हांत बसली धरुन सावली गुरं
न्हाइ चिंता त्यांची तिन्हीसांजपातुर
चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर
चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंदं !
तुम्ही बाळपणापासून जिवांचं मैतर
ही तरुणपणातील बाळपणाची लहर
कुणी बघत नाही तो चला गडे लौकर
आंबटगोडी चाखु वाटते, पुरवा की छंद
जाळीमंदी पिकली करवंदं !
मज लाज वाटते सांगाया ते धनी
घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी
पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी !
दर्या टेकड्या चला धुंडुया होउनी बेबंद
जाळीमंदी पिकली करवंदं !
न्हाइ चिंता त्यांची तिन्हीसांजपातुर
चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर
चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंदं !
तुम्ही बाळपणापासून जिवांचं मैतर
ही तरुणपणातील बाळपणाची लहर
कुणी बघत नाही तो चला गडे लौकर
आंबटगोडी चाखु वाटते, पुरवा की छंद
जाळीमंदी पिकली करवंदं !
मज लाज वाटते सांगाया ते धनी
घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी
पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी !
दर्या टेकड्या चला धुंडुया होउनी बेबंद
जाळीमंदी पिकली करवंदं !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | माणिक वर्मा |
चित्रपट | - | पुढचं पाऊल (१९५०) |
राग | - | कालिंगडा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
तिनिसांज | - | सांजवेळ, तिनिसांज, तिनिसांजा, तिनीसांज, तिनीसांजा, तिन्हिसांजा, कातरवेळ हे सर्व शब्द 'संध्याकाळ' या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सांजवणे, सांजावणे, सांजळणे म्हणजे संध्याकाळ होणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.