A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जाळीमंदी झोंबतोया गारवा

राधे, यमुनेच्या काठावर दोरवा
ग बाई बाई, जाळीमंदी झोंबतोया गारवा

बाळपणीची रिमझिम गाणी, अंगावरती शिडकावा
झिम्मा-फुगडी खेळ खेळता राधेला ग चंद्र हवा

शब्द ना बोलता बासरीचा गळा
तुझा अंबाडा बांधे कृष्ण सावळा

गोर्‍या अंगावरी मेंदी भरतो हरी
मोरपिसाचा रंग झाला झावळा
झावळी - सावळी / अंधार.
झिम्मा - लहान मुलींचा एक खेळ.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  देवकी पंडित, रवींद्र साठे