जैसी गंगा वाहे तैसे
जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन ।
भगवंत जाण त्याचे जवळी ॥१॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा ।
स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥२॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण ।
अनुभवी खूण जाणती हे ॥३॥
जाणती हे खूण स्वात्म अनुभावी ।
तुका ह्मणे पदवी ज्याची त्याला ॥४॥
भगवंत जाण त्याचे जवळी ॥१॥
त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा ।
स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥२॥
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण ।
अनुभवी खूण जाणती हे ॥३॥
जाणती हे खूण स्वात्म अनुभावी ।
तुका ह्मणे पदवी ज्याची त्याला ॥४॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | |
स्वर | - | प्रभाकर कारेकर |
गीत प्रकार | - | संतवाणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.