जगमोहन जगदीशा
जगमोहन जगदीशा
एक तूच अद्वितीय । जगती परमेशा
तू निर्गुण तरीही सगुण
बहुरूपी नटूनथटून
मायेसह विविध खेळ । खेळतोस ईशा
तूच राम तू रहीम
तूच कृष्ण तू करीम
सकल धर्म हेच मर्म । वदती सकलेशा
एक तूच अद्वितीय । जगती परमेशा
तू निर्गुण तरीही सगुण
बहुरूपी नटूनथटून
मायेसह विविध खेळ । खेळतोस ईशा
तूच राम तू रहीम
तूच कृष्ण तू करीम
सकल धर्म हेच मर्म । वदती सकलेशा
गीत | - | विद्याधर गोखले |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | भालचंद्र पेंढारकर |
नाटक | - | शाब्बास बिरबल शाब्बास |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, प्रार्थना |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.