A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जगीं हा खास वेड्यांचा

जगीं हा खास वेड्यांचा । पसारा माजला सारा ।
गमे या भ्रान्‍त संसारीं । ध्रुवाचा 'वेड' हा तारा ॥

कुणाला वेड कनकाचें । कुणाला कामिनी जाचे ।
भ्रमानें राजसत्तेच्या । कुणाचें चित्त तें नाचे ॥

कुणाला देव बहकावी । कुणाला देश चळ लावी ।
कुणाची नजर धर्माच्या । निशेनें धुंदली भारी ॥

अशा या विविध रंगाच्या । पिश्यांच्या लहरबहरींनीं ।
दुरंगी दीन दुनियेची । जवानी रंगली सारी ॥