जगि घुमवा रे दुमदुमवा रे
जगि घुमवा रे, दुमदुमवा रे भारत-गौरव-गान
या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान
उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल अमुचा देश महान
अमुचा देश महान्
काश्मीरापासून विहंगम सिंधुसंगमा जावा
नेत्रांवरती शत चित्रांचा सुंदर साज सजावा
कधि पर्वतराजी विशाला
कधि अफाट हिरवी राने
कधि झुळझुळत्या गिरिबाला
कधि रेतीची मैदाने
गंगेपासून तुंगेपावत अखंड हे वरदान
अमुचा देश महान
किति शेतकरी खळ्यात मळ्यात दिसती
कुणि कष्टकरी डोंगरदरीत वसती
किति कामकरी घामात भिजून हसती
कुणि दर्यावरी पाण्याची शेती कसती
अगणित जनगण बहुभाषी अन् बहुधर्मी बहुवेषी
एकमनाने प्रेमभराने नांदति भारत देशी
निजकलह विसरले सारा
हृदयाचे जुळले बंध
झंकारत आल्या तारा
गीताला प्रीतिसुगंध
कंपित मंथर अंतर गाते प्रेमाचे मधुगान
अमुचा देश महान
जशी साळी झुले आसामच्या शेतात राया
तशी होडी डुले केरळच्या पाण्यात राया
जशी येती फुले झेलमच्या बनात राया
तशी होरी खुले गोरीच्या मनात राया
अधीर पदांनी रुधिर धावते एकच ताल तयाला
कोटिकोटि कंठातुन आली लहरत ही स्वरमाला
गगनात दुंदुभी वाजे
थरथरली वसुधामाई
दशदिशा प्रकाशित झाल्या
लहरींतुन सागर गाई
जय जय भारत, जन ललकारत उधळुन पंचप्राण
अमुचा देश महान
या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान
उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल अमुचा देश महान
अमुचा देश महान्
काश्मीरापासून विहंगम सिंधुसंगमा जावा
नेत्रांवरती शत चित्रांचा सुंदर साज सजावा
कधि पर्वतराजी विशाला
कधि अफाट हिरवी राने
कधि झुळझुळत्या गिरिबाला
कधि रेतीची मैदाने
गंगेपासून तुंगेपावत अखंड हे वरदान
अमुचा देश महान
किति शेतकरी खळ्यात मळ्यात दिसती
कुणि कष्टकरी डोंगरदरीत वसती
किति कामकरी घामात भिजून हसती
कुणि दर्यावरी पाण्याची शेती कसती
अगणित जनगण बहुभाषी अन् बहुधर्मी बहुवेषी
एकमनाने प्रेमभराने नांदति भारत देशी
निजकलह विसरले सारा
हृदयाचे जुळले बंध
झंकारत आल्या तारा
गीताला प्रीतिसुगंध
कंपित मंथर अंतर गाते प्रेमाचे मधुगान
अमुचा देश महान
जशी साळी झुले आसामच्या शेतात राया
तशी होडी डुले केरळच्या पाण्यात राया
जशी येती फुले झेलमच्या बनात राया
तशी होरी खुले गोरीच्या मनात राया
अधीर पदांनी रुधिर धावते एकच ताल तयाला
कोटिकोटि कंठातुन आली लहरत ही स्वरमाला
गगनात दुंदुभी वाजे
थरथरली वसुधामाई
दशदिशा प्रकाशित झाल्या
लहरींतुन सागर गाई
जय जय भारत, जन ललकारत उधळुन पंचप्राण
अमुचा देश महान
गीत | - | वसंत बापट |
संगीत | - | कनू घोष |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
कसणे | - | नांगरणे. |
खळे | - | शेत. |
गिरी | - | पर्वत, डोंगर. |
दुंदुभि | - | नगारा, एक वाद्य. |
मंथर | - | मंद, हळू चालणारा. |
रुधिर | - | रक्त. |
ललकार | - | चढा स्वर / गर्जना. |
वसुंधरा (वसुधा, धरा) | - | पृथ्वी. |
साळ | - | वरच्या टरफलासहित तांदूळ. |
सिंधु | - | समुद्र. |
होरी | - | होळीचे गाणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.