जाग जाग भारता
जाग जाग भारता ! काळ कठिण ये अतां
शत्रुसैन्य पातले खड्ग उचल स्वागता
मित्रभाव राखिला तोच बंधु उलटला
कपटयुद्ध खेळला भाई-भाई बोलता
समरी ज्वाळ पेटली, कैक घेतले बळी
थोर आपुल्यातली दाखवी मृगेंद्रता
कोटी देह एक प्राण, एक लक्ष्य एक आण
मायभूस वाचवू ना विचार अन्यथा
थांब लाल राक्षसा, निश्चय बघ रे कसा
लक्ष बिंदु सांडवू एक बिंदु सांडता
बेइमान जो तया, दाखवू नको दया
देशनिष्ठ राहिला तोच बंधु आपुला
वागवी अता तरी, बोध एक अंतरी
ध्येय शांतीचे तरी रक्ष रक्ष वीरता
शत्रुसैन्य पातले खड्ग उचल स्वागता
मित्रभाव राखिला तोच बंधु उलटला
कपटयुद्ध खेळला भाई-भाई बोलता
समरी ज्वाळ पेटली, कैक घेतले बळी
थोर आपुल्यातली दाखवी मृगेंद्रता
कोटी देह एक प्राण, एक लक्ष्य एक आण
मायभूस वाचवू ना विचार अन्यथा
थांब लाल राक्षसा, निश्चय बघ रे कसा
लक्ष बिंदु सांडवू एक बिंदु सांडता
बेइमान जो तया, दाखवू नको दया
देशनिष्ठ राहिला तोच बंधु आपुला
वागवी अता तरी, बोध एक अंतरी
ध्येय शांतीचे तरी रक्ष रक्ष वीरता
गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | उषा अत्रे-वाघ, दशरथ पुजारी, आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
भू | - | पृथ्वी / जमीन. |
मृगेंद्र | - | सिंह. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.