जा रे पुढे व्हा रे पुढे
झोपू नको झणि ऊठ रे
पाहे सभोती जे घडे
घनगर्जना उठते नभी
जा रे पुढे व्हा रे पुढे
रणभेरि शिंगे वाजती
ध्वनि काय ना कानी पडे?
पडलास मुर्दाडापरी
जा रे पुढे व्हा रे पुढे
ललनाहि सजल्या संगरा
नर केवि मागे तो दडे?
चल, ऊठ, जागृत सिंहसा
जा रे पुढे व्हा रे पुढे
बांधून, मर्दा ! कंबर
तू अंबरी वरती उडे
निजपंख-बल भुललास तू
जा रे पुढे व्हा रे पुढे
जरी कष्ट-वृष्टी होइल
शिर दे अशा मारापुढे
अभिमन्यु हो अभिराम तू
जा रे पुढे व्हा रे पुढे
ती तोंडदेखी आरती
ओवाळ ना तू यापुढे
स्वप्राण करि पंचारती
जा रे पुढे व्हा रे पुढे
ठिणगी पडू दे जीवनी
वीरापरी व्हा रे खडे
रक्तध्वजा धरुनी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे
कर्मात आत्मा रंगवा
आत्मा जरी कर्मी जडे
स्वातंत्र्य तरि ते लाभते
जा रे पुढे व्हा रे पुढे
नवमंत्र घ्या तेजे नटा
व्हा सिद्ध सारे सौंगडे
चढवा स्वमाता वैभवी
जा रे पुढे व्हा रे पुढे
पाहे सभोती जे घडे
घनगर्जना उठते नभी
जा रे पुढे व्हा रे पुढे
रणभेरि शिंगे वाजती
ध्वनि काय ना कानी पडे?
पडलास मुर्दाडापरी
जा रे पुढे व्हा रे पुढे
ललनाहि सजल्या संगरा
नर केवि मागे तो दडे?
चल, ऊठ, जागृत सिंहसा
जा रे पुढे व्हा रे पुढे
बांधून, मर्दा ! कंबर
तू अंबरी वरती उडे
निजपंख-बल भुललास तू
जा रे पुढे व्हा रे पुढे
जरी कष्ट-वृष्टी होइल
शिर दे अशा मारापुढे
अभिमन्यु हो अभिराम तू
जा रे पुढे व्हा रे पुढे
ती तोंडदेखी आरती
ओवाळ ना तू यापुढे
स्वप्राण करि पंचारती
जा रे पुढे व्हा रे पुढे
ठिणगी पडू दे जीवनी
वीरापरी व्हा रे खडे
रक्तध्वजा धरुनी करी
जा रे पुढे व्हा रे पुढे
कर्मात आत्मा रंगवा
आत्मा जरी कर्मी जडे
स्वातंत्र्य तरि ते लाभते
जा रे पुढे व्हा रे पुढे
नवमंत्र घ्या तेजे नटा
व्हा सिद्ध सारे सौंगडे
चढवा स्वमाता वैभवी
जा रे पुढे व्हा रे पुढे
गीत | - | साने गुरुजी |
संगीत | - | |
स्वर | - | गजानन वाटवे, आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • काव्य रचना- जानेवारी १९३३, नाशिक तुरुंग. |
झणी | - | अविलंब. |
भेर | - | मोठा नगारा. नौबत. |
संगर | - | युद्ध. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.