जा पवना जा वेगें
जा पवना जा वेगें मिरव जनीं शुभवार्ता
शिवनेरीं घेत जन्म शुभयोगें शककर्ता !
सरली नैराश्यनिशा
उजळल्यात दाही दिशा
पूर्वक्षितिजिं येत अरुण देत अभय शिवभक्तां !
दिवस खचित सोन्याचा
घुमत गजर वाद्यांचा
अवतरला काय कृष्ण दंडण्यास परसत्ता !
सह्याचल थरथरला
गंहिवरला मनीं हंसला
पाहण्यास मुखचंद्रा आतुरली उत्सुकता !
वळत वळत बाळमुठी
लव हंसला जगजेठी
श्रीशिवाईचा प्रसाद उचलुनि घे वत्सलता !
शिवनेरीं घेत जन्म शुभयोगें शककर्ता !
सरली नैराश्यनिशा
उजळल्यात दाही दिशा
पूर्वक्षितिजिं येत अरुण देत अभय शिवभक्तां !
दिवस खचित सोन्याचा
घुमत गजर वाद्यांचा
अवतरला काय कृष्ण दंडण्यास परसत्ता !
सह्याचल थरथरला
गंहिवरला मनीं हंसला
पाहण्यास मुखचंद्रा आतुरली उत्सुकता !
वळत वळत बाळमुठी
लव हंसला जगजेठी
श्रीशिवाईचा प्रसाद उचलुनि घे वत्सलता !
गीत | - | श्रीराम आठवले |
संगीत | - | गजानन वाटवे |
स्वर | - | जानकी अय्यर |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा |
अरुण | - | तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य. |
जगजेठी | - | जगतात ज्येष्ठ असा तो, परमेश्वर. |
लव | - | सूक्ष्म. |
शक | - | वर्षगणना. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.