A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जा जा जा रे नको बोलू

जा जा जा रे नको बोलू जा ना !
जा जा मीही भिते काय कोणा?

आधी स्वत: केला गुन्हा
जोरा तुझा का रे पुन्हा सांग ना?

माझे मन वारा
भवती फिरणारा
झुरतो झुरणारा क्षणा क्षणा
स्वैर मी वाहते मुक्त मी चेतना !

मी रे फुललेली
वासंतिक वेली
सुमने भुलवावे कुणा कुणा
गंध का कोणत्या मानितो बंधना?