इचार काय हाय तुमचा
इचार काय हाय तुमचा हो पाव्हणं
इचार काय हाय तुमचा?
डोळं रोखून असं काय बघता हो पाव्हणं
इचार काय हाय तुमचा?
नाही ओळख नाही नातं
कधी झाली नाही भेट
एकटीला पाहून रस्त्यात गाठून
येड्यावानी चाळा करता
रोज येऊन मागं मागं
मन केलं तुम्ही माझं जागं
भुलवून अशी पाडलंत फशी
दुरुन हाका काय मारता?
जर असंल माझ्यावर माया
नका येळ घालवू वाया
रातच्यापारी आज माझ्या घरी
मला हळूच येऊन भेटा
इचार काय हाय तुमचा?
डोळं रोखून असं काय बघता हो पाव्हणं
इचार काय हाय तुमचा?
नाही ओळख नाही नातं
कधी झाली नाही भेट
एकटीला पाहून रस्त्यात गाठून
येड्यावानी चाळा करता
रोज येऊन मागं मागं
मन केलं तुम्ही माझं जागं
भुलवून अशी पाडलंत फशी
दुरुन हाका काय मारता?
जर असंल माझ्यावर माया
नका येळ घालवू वाया
रातच्यापारी आज माझ्या घरी
मला हळूच येऊन भेटा
गीत | - | राम मोरे |
संगीत | - | विश्वनाथ मोरे |
स्वर | - | रोशन सातारकर |
गीत प्रकार | - | लावणी |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.