हुकुमाची राणी माझी
हुकुमाची राणी माझी
राया, मी डाव जिंकला
लागला रंग तुम्हा, साधले डाव दोन
कैफात गुंग होता राहिले नाही भान
बायकी कावा माझा, राखून पत्ता ठेवला
उतारी करा आता, चवर्या दुर्र्या टाका
आताच मारला ना बदामी माझा एक्का?
कटाप रंग चारी, हुकूम हाती राहिला
मघाचा डाव कसा ध्यानात नाही आला?
हातात राणी माझ्या, गुलाम सर केला
उलटली बाजी आता, राणीनं राजा मारला
राया, मी डाव जिंकला
लागला रंग तुम्हा, साधले डाव दोन
कैफात गुंग होता राहिले नाही भान
बायकी कावा माझा, राखून पत्ता ठेवला
उतारी करा आता, चवर्या दुर्र्या टाका
आताच मारला ना बदामी माझा एक्का?
कटाप रंग चारी, हुकूम हाती राहिला
मघाचा डाव कसा ध्यानात नाही आला?
हातात राणी माझ्या, गुलाम सर केला
उलटली बाजी आता, राणीनं राजा मारला
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | जशास तसें |
गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
कावा | - | कारस्थान / लबाडी, ढोंग. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.