होणार स्वयंवर तुझे
होणार स्वयंवर तुझे जानकी ग आता
जामात कोणता मिळेल नकळे ग ताता
ही लतेसारखी धरणीमधुनी आली
तो गगनामधुनी येईल का ग खाली?
देईल आलिंगन वेली मूर्त वसंता
तुज पती पाहिजे ग श्यामल मेघावाणी
ही आवड माझी तुला कथियली ग कोणी
डोळ्यांत तुझ्या ती दिसते येताजाता
तो तोच असावा ज्याची ऐकून कीर्ती
या मनी तयाची आकारून ये मूर्ती
लाजसी अशी का नाव तयाचे घेता
ते नाव जाहले अधरावर या रंग
त्या नामस्मरणे कंपित होते अंग
मिटतात लोचने बधिरपणा ये चित्ता
जामात कोणता मिळेल नकळे ग ताता
ही लतेसारखी धरणीमधुनी आली
तो गगनामधुनी येईल का ग खाली?
देईल आलिंगन वेली मूर्त वसंता
तुज पती पाहिजे ग श्यामल मेघावाणी
ही आवड माझी तुला कथियली ग कोणी
डोळ्यांत तुझ्या ती दिसते येताजाता
तो तोच असावा ज्याची ऐकून कीर्ती
या मनी तयाची आकारून ये मूर्ती
लाजसी अशी का नाव तयाचे घेता
ते नाव जाहले अधरावर या रंग
त्या नामस्मरणे कंपित होते अंग
मिटतात लोचने बधिरपणा ये चित्ता
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत देसाई |
स्वर | - | आशा भोसले, उषा मंगेशकर |
चित्रपट | - | स्वयंवर झाले सीतेचे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
जामात | - | जावई. |
लता (लतिका) | - | वेली. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.