होकारही मिळेना
होकारही मिळेना, इन्कारही कळेना
हे वेड लागलेले पुरतेपणी सुटेना
संकेत रोज होती, येती जुळून भेटी
भेटीत त्या परंतु राही अबोल प्रीती
त्या गोड यौवनाशी संवादही जुळेना
दिनरात ध्यास लागे, हे श्वास भास होती
जागेपणात सार्या जाती सरून राती
काहूर अंतरीचे स्वप्नातही सरेना
ना सांगवे कुणाला, ना साहवे मनाला
जळत्या दिव्यास राही अंधार सोबतीला
प्रीतीतल्या जिवाचा छळवादही चुकेना
हे वेड लागलेले पुरतेपणी सुटेना
संकेत रोज होती, येती जुळून भेटी
भेटीत त्या परंतु राही अबोल प्रीती
त्या गोड यौवनाशी संवादही जुळेना
दिनरात ध्यास लागे, हे श्वास भास होती
जागेपणात सार्या जाती सरून राती
काहूर अंतरीचे स्वप्नातही सरेना
ना सांगवे कुणाला, ना साहवे मनाला
जळत्या दिव्यास राही अंधार सोबतीला
प्रीतीतल्या जिवाचा छळवादही चुकेना
गीत | - | राम मोरे |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | अजितकुमार कडकडे |
गीत प्रकार | - | भावगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.