हिरव्या कुरणी घडली कहाणी
हिरव्या कुरणी घडली कहाणी बाई नवलाची
नाजुक हरिणी गेली करून शिकार वाघाची
वादळवारा असाच आला
अशीच बिजली लवलवली
हरिणीच्या त्या मोहक नयनी
धुंद कस्तुरी घमघमली
शिकारी नजर वाघाची बघुन भुललेली
खेचली धनुकली हसून तिने नयनाची
उरी तयाच्या बाण लागता
तिची जवानी थयथयली
व्याकुळतेने शपथ घालता
चंचल हरिणी हळहळली
माघारी नयन सुंदरी परत वळलेली
हळुहळु जखम ती आली मिळून हृदयाची
नाजुक हरिणी गेली करून शिकार वाघाची
वादळवारा असाच आला
अशीच बिजली लवलवली
हरिणीच्या त्या मोहक नयनी
धुंद कस्तुरी घमघमली
शिकारी नजर वाघाची बघुन भुललेली
खेचली धनुकली हसून तिने नयनाची
उरी तयाच्या बाण लागता
तिची जवानी थयथयली
व्याकुळतेने शपथ घालता
चंचल हरिणी हळहळली
माघारी नयन सुंदरी परत वळलेली
हळुहळु जखम ती आली मिळून हृदयाची
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | वादळ |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
कस्तुरी | - | एक अतिशय सुगंधी द्रव्य. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.