हिरवेपिवळे तुरे उन्हाचे
हिरवेपिवळे तुरे उन्हाचे
खोविलेस केसांत उगा का?
वार्याचे हळू पीस फिरवुनी
उसळ्यास हिरव्या लहरी का?
पिवळीकाळी फूलपाखरें
फेकुनी मजवर भिवविसी का?
लाल फुलांनी भरता ओंजळ
माझी मजवर उधळसी का?
सहसा शिंपुनी गुलाबपाणी
ढगाआड दडलास वृथा का?
प्रतिबिंबानी निळ्याजांभळ्या
तनमन अवघे व्यापिसी का?
अशी हरवली राणी मीरा
अशी हरवली राधा गौळण
असेच मी मज हरवून जावे
हेच तुझ्या मनी जागत का?
खोविलेस केसांत उगा का?
वार्याचे हळू पीस फिरवुनी
उसळ्यास हिरव्या लहरी का?
पिवळीकाळी फूलपाखरें
फेकुनी मजवर भिवविसी का?
लाल फुलांनी भरता ओंजळ
माझी मजवर उधळसी का?
सहसा शिंपुनी गुलाबपाणी
ढगाआड दडलास वृथा का?
प्रतिबिंबानी निळ्याजांभळ्या
तनमन अवघे व्यापिसी का?
अशी हरवली राणी मीरा
अशी हरवली राधा गौळण
असेच मी मज हरवून जावे
हेच तुझ्या मनी जागत का?
गीत | - | इंदिरा संत |
संगीत | - | वसंत आजगांवकर |
स्वर | - | वसंत आजगांवकर |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.