हेच ते ग तेच हे ते
हेच ते ग, तेच हे ते, स्वप्नी येती सारखे
मूर्त केले स्वप्न तू हे चित्ररेखे लाडके
हेच डोळे ते टपोरे, हीच कांती सावळी
नासिकेखालील रेषा हीच काळी कोवळी
हेच हसरे ओठ बाई मूक तरीही बोलके
हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकिले
लाजूनिया चूर झाले भीत डोळे झाकिले
ओळखिली माळ मी ही, हीच मोती-माणिके
गुज करिती हे कधी ग धरून माझी हनुवटी
प्रश्न पुशिती धीट केव्हा मूठ पडते मनगटी
ओठ ओले करुन जाती काय सांगू कौतुके?
मूर्त केले स्वप्न तू हे चित्ररेखे लाडके
हेच डोळे ते टपोरे, हीच कांती सावळी
नासिकेखालील रेषा हीच काळी कोवळी
हेच हसरे ओठ बाई मूक तरीही बोलके
हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकिले
लाजूनिया चूर झाले भीत डोळे झाकिले
ओळखिली माळ मी ही, हीच मोती-माणिके
गुज करिती हे कधी ग धरून माझी हनुवटी
प्रश्न पुशिती धीट केव्हा मूठ पडते मनगटी
ओठ ओले करुन जाती काय सांगू कौतुके?
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | आशा भोसले |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.