A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे वदन तुझे की कमळ निळे

हे वदन तुझे की कमळ निळे?
का नयन पाहता होती खुळे?

विशाल झाले शांत सरोवर
नयनांपुढती अथांग सागर
शेषशायी तव रूप मनोहर-
हलके हलके वर उजळे !

कुठे सख्यांचा मेळा लपला?
कोठे उपवन, कोठे मिथिला?
श्रीविष्णू तू, मी तर कमला
शतजन्म चुरिन मी पदकमले !