हे सुरांनो चंद्र व्हा
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वराविष्कार | - | ∙ पं. जितेंद्र अभिषेकी ∙ अर्चना कान्हेरे ∙ शौनक अभिषेकी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | ययाति आणि देवयानी |
राग | - | चारुकेशी |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, नाट्यसंगीत |
तम | - | अंधकार. |
मानस | - | मन / चित्त / मानस सरोवर. |
नोंद
माझ्या प्रियकराचे मन-चित्त हरवलंय, स्थिर नाहीये. एकाकी, अंधार्या वाटेने ते भरकटलंय. त्याची ही पीडा दूर करण्यासाठी, (मी जे गाणे गाते आहे त्याच्या) हे सुरांनो, तुम्ही चंद्र व्हा. तुमच्या (अमृतासारख्या) चांदण्याच्या शीतलतेने त्याला न्हाऊ घाला.

हे पद नाटकात शर्मिष्ठेच्या तोंडी आहे आणि ती ते ययातीसाठी म्हणते आहे.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.