हे मना आज कोणी
हे मना आज कोणी बघ तुला साद घाली
जाण रे दाटलेली ही किमया भोवताली
हा वारा तान घेई
निर्झरही साथ देई
गुणगुणती दिशा दाही
घे जाणून मूक बोली
वेद गाती रम्य लाटा
फूल फुलवी गंधगाथा
किरण होउन रे विधाता
लोपवितो रात्र काळी
शोधिशी तू सौख्य कोठे?
जीवनाशी जोड नाते
साठला रे स्वर्ग येथे
राहिली का रिक्त झोळी?
जाण रे दाटलेली ही किमया भोवताली
हा वारा तान घेई
निर्झरही साथ देई
गुणगुणती दिशा दाही
घे जाणून मूक बोली
वेद गाती रम्य लाटा
फूल फुलवी गंधगाथा
किरण होउन रे विधाता
लोपवितो रात्र काळी
शोधिशी तू सौख्य कोठे?
जीवनाशी जोड नाते
साठला रे स्वर्ग येथे
राहिली का रिक्त झोळी?
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | महंमद रफी |
गीत प्रकार | - | मना तुझे मनोगत, भावगीत |
निर्झर | - | झरा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.