हे घनःश्याम श्रीराम
हे घनःश्याम श्रीराम । मदात्माराम ॥
स्वातंत्र्य सकल सुखनिधि । समर्पूनि कधीं । पुरविशील काम ॥
त्वां अमेरिका सुखविली । स्वातंत्र्यें ।
भू जपानची नटविली । स्वातंत्र्यें ।
इटलीहि तशी हंसविली । स्वातंत्र्यें ।
मग आर्यभूच कां पारतंत्र्य कर्दमीं फसविली? । राम ! ॥
हे पक्षी तरुवरि गाती । स्वच्छंन्दे ।
काननी त्यापरी रमती । मृगवृन्दें ।
स्वातंत्र्य-सौख्य सेवीती । आनन्दें ।
मग आम्हांलाच कां पारतंत्र्य-पंजरीं कोंडिलें? राम ! ॥
दण्डूनि दशानन तेव्हां । कोदण्डें ।
सुर-वृन्द रक्षिला देवा । आनन्दें ।
पाण्डवां राज्य दिधलें त्वां । गोविन्दें ।
मग आम्हांवरिच कां दया न करिशि । मुनींद्र- जनविश्राम? ॥

गीत | - | कवी गोविंद |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वर | - | सुधीर फडके |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
कर्दम | - | चिखल. |
कानन | - | अरण्य, जंगल. |
कोदंड | - | धनुष्य. |
पंजर | - | पिंजरा. |
सुर | - | देव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.