हे गीत जीवनाचे
मागेपुढे पहाते, रचिते भविष्य काही
होणार काय आहे, ते मात्र ज्ञात नाही
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
गाते परि कळेना, हे गीत जीवनाचे
आनंद-दुःख यांचे नाते मुळी जुळेना
ओठांवरील माझ्या गाणे तरी खळेना
सुखदायी गीत होते सार्याच भावनांचे
माझ्याच गायनी मी लयधुंद होत जाते
गाण्यास रागिणीचा हळुवार रंग येतो (देते)
वाजे प्रसन्न वीणा उत्फुल्ल ताल नाचे
होणार काय आहे, ते मात्र ज्ञात नाही
स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे
गाते परि कळेना, हे गीत जीवनाचे
आनंद-दुःख यांचे नाते मुळी जुळेना
ओठांवरील माझ्या गाणे तरी खळेना
सुखदायी गीत होते सार्याच भावनांचे
माझ्याच गायनी मी लयधुंद होत जाते
गाण्यास रागिणीचा हळुवार रंग येतो (देते)
वाजे प्रसन्न वीणा उत्फुल्ल ताल नाचे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वराविष्कार | - | ∙ लता मंगेशकर ∙ पं. सत्यशील देशपांडे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
चित्रपट | - | हे गीत जीवनाचे |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.