A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हे गर्द निळे मेघ

हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज
मन आज दिवाणे ग

तार्‍यांत असे जाग, धरणीस नसे नीज
हळू बोल सखे तू ग

घे शाल मिठीची ही, बिलगून अशी राही
रे सूर खुणांनी का हसतात दिशा या ग

मी होउनिया मुरली रे आले तुझ्या जवळी
हे ओठ मुरारीचे किती काळ उपाशी ग

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  अनुराधा पौडवाल, विनयकुमार