हे गणनायक सिद्धीविनायक
हे गणनायक, सिद्धीविनायक
वंदन पहिले तुला गणेशा
रसीकजनांनी भरले अंगण
व्हावे मनाच्या त्यांच्या रंजन
लवकर यावे दर्शन द्यावे
घ्यावे जवळी एकच आशा
चाळ बोलती छुनछुन पायी
जणू अवतरली इंद्रसभा ही
गुणवंतांचा आश्रय मिळतो
कीर्तनरूपी असे तमाशा
मेळा जमला ताल-सूरांचा
रंग उधळला शिणगाराचा
दिनरातीला जागत राहो
जनसेवेतून अमुचा पेशा
वंदन पहिले तुला गणेशा
रसीकजनांनी भरले अंगण
व्हावे मनाच्या त्यांच्या रंजन
लवकर यावे दर्शन द्यावे
घ्यावे जवळी एकच आशा
चाळ बोलती छुनछुन पायी
जणू अवतरली इंद्रसभा ही
गुणवंतांचा आश्रय मिळतो
कीर्तनरूपी असे तमाशा
मेळा जमला ताल-सूरांचा
रंग उधळला शिणगाराचा
दिनरातीला जागत राहो
जनसेवेतून अमुचा पेशा
गीत | - | मा. दा. देवकाते |
संगीत | - | बाळ पळसुले |
स्वर | - | रामदास कामत |
चित्रपट | - | पटलं तर व्हय म्हणा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, प्रथम तुला वंदितो, लोकगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.