हे गगना तू माझ्या गावी
हे गगना, तू माझ्या गावी
आणि तिच्याही गावी
तुला उदारा, पहिल्यापासुन
सर्व कहाणी ठावी.
अशी दूरता अपार घडता
एक तुझीच निळाई
अंतरातही एकपणाचे
सांत्वन जगवित राही.
घन केसातुनि तिच्या अनंता
फिरवत वत्सल हात
सांग तिला की दूर तिथेही
जमू लागली रात.
आणि तिच्याही गावी
तुला उदारा, पहिल्यापासुन
सर्व कहाणी ठावी.
अशी दूरता अपार घडता
एक तुझीच निळाई
अंतरातही एकपणाचे
सांत्वन जगवित राही.
घन केसातुनि तिच्या अनंता
फिरवत वत्सल हात
सांग तिला की दूर तिथेही
जमू लागली रात.
गीत | - | कुसुमाग्रज |
संगीत | - | श्रीधर फडके |
स्वर | - | श्रीधर फडके |
गीत प्रकार | - | भावगीत |
घडत असलेल्या एखाद्या प्रसंगाला किंवा मानसिक अनुभवाला एक अकस्मित वळण देऊन स्तिमित करणारा परिणाम कुसुमाग्रज अनेकदा साधतात व त्यातून त्या अनुभवाला सौंदर्य, वेधकता प्राप्त करून देत त्या अर्थाचा विकास घडवतात.
'याचक' कवितेमध्ये त्या याचकाचा कटोरा कशानेही भरेना, पण भिकारणीने पोर बाजूस करून स्तनातले दोन थेंब कटोर्यात टाकले तर तो अथांग भरला, हे त्याचे एक उदाहरण, तर कणा कवितेतल्या नायकाचा सारा संसार उद्ध्वस्त झाला असताही आणि सरांकडून पैसे मिळण्याची संधी आली असताही, 'पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, ' असे सांगून पुढे म्हणतो,
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते 'लढ' म्हणा येथली अगदी अनपेक्षित अशी प्रतिक्रिया त्या सर्व कवितेला एकदम उंचावर नेऊन ठेवते, अशा समर्थपणे की कवी आणि नायकव्यक्ती या दोघांसाठीही एक उत्स्फूर्त 'वाहवा'ची दाद दिली जाते. नाट्यपूर्ण कलाटणीच्या या फार स्पष्ट जागा झाल्या. पण हीच धाटणी अत्यंत सूक्ष्मपणे कुसुमाग्रजांच्या कवितेत कार्य करते. ती अर्थाला, त्यातील भावनेला एकदम धार प्राप्त करून देते, तिची उत्कटता वाढवते. 'हे गगना या कवितेत, त्या गगनाबरोबर सखीला काहीतरी संदेश त्या दूर एकाकी असलेल्या प्रियकराला कळवायचा आहे. तो म्हणतो,
घन केसातुनि तिच्या अनंता
फिरवित वत्सल हात
सांग तिला की दूर तिथेही- तो निरोप काय असेल याची अपेक्षा नेणिवेतून जाणिवेकडे येत असतानाच पुढे-
जमु लागली रात असे शब्द येऊन ती सर्व कविता कारुण्याने भरून जाते.
(संपादित)

शंकर वैद्य
'प्रवासी पक्षी' या कुसुमाग्रजांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.