हे चांदणे फुलांनी शिंपीत
हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
तारे निळ्या नभात हे गुज सांगतात
का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस
ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली
तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा
ती रात्र धुंद होती स्वप्नांत दंगलेली
धरती प्रकाश वेडी ओल्या दंवात न्हाली
तारे निळ्या नभात हे गुज सांगतात
का रंग वेगळा हा फुलत्या नव्या कळीस
ओठांतल्या स्वरांना का जाग आज आली
तो स्पर्श चंदनाचा की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला स्वप्नांतल्या स्वरांचा
ती रात्र धुंद होती स्वप्नांत दंगलेली
गीत | - | मधुसूदन कालेलकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | अनुराधा पौडवाल |
चित्रपट | - | चांदणे शिंपीत जाशी |
गीत प्रकार | - | चित्रगीत, शब्दशारदेचे चांदणे |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.