हे चांदणे ही चारुता
हे चांदणे ही चारुता, ही भावभोळी लोचने
मधुचंद्र हा मधु यामिनी, ही प्रीतिची मधुगुंजने
पानांतुनी हलके फुले, कळी कोवळी सुम होउनी
मधुगंध हा तव प्रीत का ऐसी सुखाची गायने
सुख मोहरे तनु बावरे, हळुवार कापे मोहुनी
ये ये अशी या मानसी, फुलवीत प्रीती पैंजणे

गीत | - | शांताराम नांदगांवकर |
संगीत | - | अनिल मोहिले |
स्वर | - | अरुण दाते, कुंदा बोकिल |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, युगुलगीत, भावगीत |
चारू | - | सुंदर. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.