ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे
हृदयात जागणार्या अतिगूढ संभ्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे !
विसरून जाय जेव्हा माणूस माणसाला
जाळीत ये जगाला विक्राळ एक ज्वाला
पुसतात डाग तेही धर्मांध आक्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे !
हे बंध रेशमाचे ठेवी जपून जीवा
धागा अतूट हाच प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बळांना देती पराक्रमाचे
तुटतील ना कधीही हे बंध रेशमाचे !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
स्वर | - | पं. जितेंद्र अभिषेकी |
नाटक | - | हे बंध रेशमाचे |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
कोण म्हणतो? धर्म निष्पाप, अजाण असतो. माणुसकीचं बोट धरून धर्म चालतो, तेव्हा पृथ्वीवर स्वर्ग अवतरल्याचा भास होतो. पण नुसत्या धर्माचं बोट धरून माणूस जेव्हा चालायला लागतो, तेव्हा स्वर्गाचा नरक बनायला फारसा वेळ लागत नाही. पाठीशी घेतलेली चीजवस्तूच नव्हे, पण बरोबरची माणसंसुद्धा कडेपर्यंत सुखरूप पोहोचत नाहीत..
फाळणीच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांच्या अतूट मैत्रीवर साकारलेलं नाटक !
(संपादित)
'हे बंध रेश्माचे' या नाटकाच्या पुस्तकाच्या मलपृष्ठावरून.
सौजन्य- मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.