हासता मी हाससी का
हासता मी हाससी का, सांग चंद्रा सांग रे
अंतरीच्या अंगणी या रातराणी मोहरे
पुष्पपडदा पापणीचा सरसरा मी ओढुनी
नेत्र माझे राजसाचे चित्र घेता काढुनी
पाहिले ते का कधी तू भाव माझे लाजरे
गुज माझे रंगता हे चंद्रिकेच्या लोचनी
दृष्ट माझी नाचते रे होऊनिया मोहिनी
पौर्णिमेच्या तू कपोली गीत माझे वाच रे
दूर तेथे तरूतळी त्या प्रीत माझी बैसली
मानसीच्या मीलनाला बिलगुनी ती हासली
मूक वाचा मूक भाषा प्रश्न देई उत्तरे
अंतरीच्या अंगणी या रातराणी मोहरे
पुष्पपडदा पापणीचा सरसरा मी ओढुनी
नेत्र माझे राजसाचे चित्र घेता काढुनी
पाहिले ते का कधी तू भाव माझे लाजरे
गुज माझे रंगता हे चंद्रिकेच्या लोचनी
दृष्ट माझी नाचते रे होऊनिया मोहिनी
पौर्णिमेच्या तू कपोली गीत माझे वाच रे
दूर तेथे तरूतळी त्या प्रीत माझी बैसली
मानसीच्या मीलनाला बिलगुनी ती हासली
मूक वाचा मूक भाषा प्रश्न देई उत्तरे
गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
चित्रपट | - | आकाशगंगा |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत |
कपोल | - | गाल. |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
चंद्रिका | - | चांदणे. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.