हासत वसंत ये वनी
हासत वसंत ये वनी, अलबेला !
प्रियकर पसंत हा मनी धरणीला !
घनवनराई बहरुनी येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला, चाफा झाला पिवळा
जाईजुई चमेलीला भर आला शेवंतीला, घमघमला !
सतेज टवटवली, कळी जशी कवळी
चंद्रकोर इवली नभात लुकलुकली
आला शीतळ वारा, बरसत अमृतधारा
मृदुल फुलांचा करी झुला !
प्रियकर पसंत हा मनी धरणीला !
घनवनराई बहरुनी येई
कोमल मंजुळ कोयल गाई
आंबा पाही फुलला, चाफा झाला पिवळा
जाईजुई चमेलीला भर आला शेवंतीला, घमघमला !
सतेज टवटवली, कळी जशी कवळी
चंद्रकोर इवली नभात लुकलुकली
आला शीतळ वारा, बरसत अमृतधारा
मृदुल फुलांचा करी झुला !
गीत | - | शांताराम आठवले |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | जयश्री, वसंत देसाई |
चित्रपट | - | शेजारी |
ताल | - | केरवा |
गीत प्रकार | - | चित्रगीत, युगुलगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.