हसले मनिं चांदणें
हसले मनिं चांदणें
जपुनी टाक पाउलं साजणी नादतील पैंजणें
बोचतील ग फुलं जाईची तुझी कोमल काय
चांदण्यांतही सौंदर्या रे पोळतील ना पाय !
पानांच्या जाळींत लपोनी, चंद्र पाहतो गडे
सांग कुणाच्या भेटीसाठीं जीव सारखा उडे !
हो जरा, बघा कीं वरी, कळूं द्या तरी, उमटुं द्या वाणी
का आढेवेढे उगाच सांगा काय लागलें राणी?
कां ग अशा पाठीस लागता मिळुनी सार्याजणी !
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी
किती किती ग भाग्याची भलतीच ओढ ही कामसुंदराची
नव्हे ग श्यामसुंदराची, हसले मनिं चांदणें

गीत | - | राजा बढे |
संगीत | - | पु. ल. देशपांडे |
स्वर | - | माणिक वर्मा |
राग | - | चंद्रकंस |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत, मना तुझे मनोगत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.