हरवले ते गवसले का
हरवले ते गवसले का? गवसले ते हरवले का?
मीलनाचा परिमल तोचि, फूल तेचि त्या स्वरूपी
पाकळ्यांच्या उघडझापी, हास्य उमले वेगळे का?
पावसाळी ग्रीष्म सरिता, सागराला फिरूनि मिळता
जलाशयाची सृष्टी आता, मृगजळे ही व्यापिली का?
दूर असता जवळी आले, जवळी येता दूर गेले
जो न माझे दुःख हसले, तोचि सुखही दुखावले का?

गीत | - | पी. सावळाराम |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | पूर्वा कल्याण |
गीत प्रकार | - | भावगीत |
सरिता | - | नदी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.