A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हळूच या हो हळूच या

हळूच या हो, हळूच या !

गोड सकाळी ऊन पडे
दंवबिंदूंचे पडति सडे
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललो जगती
हृदये अमुची इवलीशी
परि गंधांच्या मधि राशी
हासुन डोलुन
देतो उधळुन
सुगंध या तो सेवाया;
हळूच या; पण हळूच या !

कधि पानांच्या आड दडू
कधि आणू लटकेच रडू
कधि वार्‍याच्या झोताने
डोलत बसतो गमतीने
तर्‍हेतर्‍हेचे रंग किती
अमुच्या या अंगावरती
निर्मल सुंदर
अमुचे अंतर
या आम्हाला भेटाया;
हळूच या; पण हळूच या !