हले डुले हले डुले
हले डुले हले डुले पाण्यावरी नाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
कुठून बाई ऐकु येई पावा
उगीच कसा भास असा व्हावा
कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव
शांत जली का हलली छाया
कोण असे भुलवितसे वाया
हळूच हसे लपुनी बसे चालवुनी भाव
कुजबुजते माझ्या मी कानी
गुणगुणते अस्फुट ही गाणी
मीच हसे मीच फसे, काय हा स्वभाव
पैलतिरी असेल माझ्या राजसाचा गाव
कुठून बाई ऐकु येई पावा
उगीच कसा भास असा व्हावा
कोण दूर घुमवी सूर लागेना ग ठाव
शांत जली का हलली छाया
कोण असे भुलवितसे वाया
हळूच हसे लपुनी बसे चालवुनी भाव
कुजबुजते माझ्या मी कानी
गुणगुणते अस्फुट ही गाणी
मीच हसे मीच फसे, काय हा स्वभाव
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | वसंत पवार |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | स्त्री जन्मा ही तुझी कहाणी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
पावा | - | बासरी, वेणु. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.