हाचि नेम आतां
हाचि नेम आतां न फिरें माघारीं ।
बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें ।
वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आतां ।
नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥
बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें पट्टराणी बळें ।
वरिलें सावळें परब्रह्म ॥२॥
बळियाचा अंगसंग झाला आतां ।
नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥३॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | संतवाणी |
पट्टराणी | - | मुख्य राणी अथवा अभिषिक्त राणी. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.