हा मदिर भोवताल
हा मदिर भोवताल स्वप्न भारला
या सुखात धुंद आज होऊ दे मला !
लोचनात रिमझिमली वीजपाखरे
स्पर्शातुन जाईचे उमलले तुरे
थरथरत्या गुंजनात जीव गुंतला
शब्दांना ओठांवर मिटुन राहू दे
मौनातच सारे जग विरुन जाऊ दे
श्वासांतुन बहरू दे स्वप्न-सोहळा
या सुखात धुंद आज होऊ दे मला !
लोचनात रिमझिमली वीजपाखरे
स्पर्शातुन जाईचे उमलले तुरे
थरथरत्या गुंजनात जीव गुंतला
शब्दांना ओठांवर मिटुन राहू दे
मौनातच सारे जग विरुन जाऊ दे
श्वासांतुन बहरू दे स्वप्न-सोहळा
गीत | - | वंदना विटणकर |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | पुष्पा पागधरे |
गीत प्रकार | - | भावगीत, कल्पनेचा कुंचला |
मदिर | - | धुंद करणारा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.