हा हिमालय गर्जुनी सांगे पहा
हा हिमालय गर्जुनी सांगे पहा सांगे पहा
देशवासी बांधवांनो जागे रहा जागे रहा
आज वारे वाहताहे, भोवती जग ते कसे?
जाणुनी घ्या स्पर्श त्याचा भासतो जगता कसे
भेद सारे क्षुद्र काही विसरुनी एकत्र व्हा
कोणची सत्ता मदांधे भूक कुणाची चिरडिते
या अशा समयास ठेवा दीप नेत्री पेटते
शांतीचे सामर्थ्य अंगी, व्हा प्रसंगी वज्र व्हा
अंतरीच्या जाणीवांनी प्रेरणा घ्या प्रेरणा
अन् कृतीने संपवाया ह्या जगाची वेदना
भारताची शान सुंदर रात्र या जागे रहा

गीत | - | गिरीबाल |
संगीत | - | भूमानंद बोगम |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.